पुणे | पुणे अपघातप्रकरणी आरोपीच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. अटकेनंतर अवघ्या काही तासांतच 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन आरोपीचा जामीन मंजूर झाला. या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.
“अजित पवारांची नार्को टेस्ट करावी”
याप्रकरणी अजित पवारांची (Ajit Pawar) नार्को टेस्ट करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली होती. या अपघात प्रकरणानंतर अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अनेक फोन केले होते. मी हे अनेक पत्रकारांच्या समाज माध्यमांवरील पोस्ट आणि प्रसारमाध्यमांवरील बातम्यांच्या आधारे बोलत आहे. अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केल्याची शंका माझ्याही मनात होती. तसेच ते अनेक दिवस या प्रकरणावर काहीच बोलत नव्हते, असंही त्या म्हणाल्या.
पुण्यातील अपघात प्रकरणानंतर होऊ लागलेल्या आरोपांवर अजित पवार (Ajit Pawar) धादांत खोटी उत्तरं देत आहेत. अजित पवार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अजित पवारांचा फोन जप्त करायला हवा आणि त्यांची नार्को टेस्ट करायला हवी, असं त्या म्हणालेल्या.
तुमचे विशाल अग्रवालचे संबंध नसतील, तुमचे आर्थिक व्यवहार नसतील आणि तुमच्या नार्को टेस्टमध्ये तुम्ही क्लीन आला तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, मी संन्यास घेईन. मी कुठलाही सामाजिक विषय कधीही लढणार नाही, असं आव्हान त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) दिलं. यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर
माझी नार्को टेस्टची तयारी आहे. त्या चाचणीत काही आढळलं नाही तर अंजली दमानिया यांनी पुन्हा कुठे पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.
दरम्यान अंजली दमानिया यांनी पुन्हा अजित पवारांनी उत्तर दिलंय. मी तुमचं आव्हान स्वीकारत आहे. त्यात तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार, हे सांगा. तुम्ही दोषी आढळले नाही तर तुमच्या मागणीप्रमाणे मी घरी बसून राहील, असं त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे
मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
‘मनुस्मृती मनातून…’; प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावलं
डॉ. श्रीहरी हळनोरची मोठी कबुली; डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार
वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, धक्कादायक माहिती आली समोर