मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर थेट आरोप करतात. त्यातच आता किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात माहिती दिली आहे.
अजित पवारांनी केलेला 1200 कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झालेला आहे. ईडीने या कारखान्याची प्रॉपर्टी अटॅच केली होती. न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली आहे. माझी भारत सरकार आणि ईडीला विनंती आहे की, हा कारखाना पुन्हा 27 हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
ईडीने काही दिवसांपूर्वी जरंडेश्वर कारखाना सील केला होता. तसेच जरंडेश्वर कारखान्यासंबंधित 1200 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली होती. सदर कारखाना अजित पवारांच्या नातेवाईकांच्या खासगी मालकीचा असून जरंडेश्वर शुगर या नावाने चालवला जातो. न्यायालयाच्या मान्यतेमुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जरंडेश्वर कारखाना लिलावावेळी कमी किंमतीत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची ईडी चौकशी करण्यात आली. तसेच किरीट सोमय्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे 21 ऑक्टोबर 2021 रोजी ईडीसमोर सादर केली होती.
थोडक्यात बातम्या-
“मी आमदार खासदार जन्माला घालणारा माणूस, त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी…”
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Corona: कोरोनाच्या वाढत्या शिरकावामुळे ‘या’ ठिकाणी चिंतेचं वातावरण
“काही वर्षांपूर्वीच कोकणातील घाण आपण पळवून लावली”
‘आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला’; अन्यथा…
Comments are closed.