बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं अन् रडणं बाईसारखं- गोपिचंद पडळकर

सोलापूर | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाक्युद्ध संपत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज अजित पवार यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रातील हे दोन नेते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करत असल्याचं दिसून येत आहे. पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं असल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी “अजित पवार यांचं बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं आहे” अशा शब्दात अजित पवारांवर टीका केली आहे.

गुरुवारी आयोजित कासेगावच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका करत, “तुमच्याकडे एक नेता जोरदार भाषण करत फिरतोय, त्याचं डिपॉझिटसुद्धा त्याला बारामतीमध्ये त्याला वाचवता आलं नव्हतं आणि हा कोणाच्या तोंडाने मत मागतोय?” असं म्हणत गोपीचंद पडळकर यांना चिमटा काढला होता.

गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांचं बोलणं टग्यासारखं आहे आणि रडणं बाईसारखं आहे अशा शब्दात मंगळवेढा येथे आयोजित एका सभेत सडकून टीका केली आहे. या सर्व प्रकरणात आता अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

वीकेंड लाॅकडाऊनच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी धक्कादायक

रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सची भन्नाट आयडिया, वाचा सविस्तर

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

लस घेतल्यानंतरही पुन्हा होतोय कोरोना?; सीरमच्या अदर पुनावालांनी सांगितलं खरं कारण

पुण्यात वीकेंड लाॅकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More