मुंबई | बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर झालेल्या दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी निषेध नोंदवला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहेत.
बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारनं खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही, असं अजित पवार म्हणालेत.
अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारनं दाखवावी. कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत, असा आरोप अजित पवारांनी केलाय.
महाराष्ट्र सरकारनं यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीनं सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘…नाहीतर मलाही बेळगावला जावं लागेल’; शरद पवारांचा इशारा
- ‘आता वेळ आली आहे’; कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर शरद पवार स्पष्टच बोलले
- “शिवरायांच्या पुतळ्याला एलईडी लावायला पैसे दिले तर मला माझे कपडे विकावे लागतील”
- काळजी घ्या! डायबेटिसबाबत अभ्यासातून मोठा खुलासा
- ‘शरद पवारांनी स्वत: ड्रायव्हर असल्याचं सांगत…’; सुप्रिया सुळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा