बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’; अजित पवारांचा इशारा

नाशिक | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तसेच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा यापूर्वी दिला आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

कोरोनाची तिसरी लाट आली तर ती तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक असेल, असं टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सावध राहा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार गुरूवारी नाशिकमध्ये होते. त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

येत्या दोन महिन्यात 70 टक्के लसीकरण करण्याचं ठाकरे सरकारचं टार्गेट आहे. मात्र, एवढ्या लस नाहीत. तरीही आम्ही हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच कोरोना कामात निधीची कमतरता भासू नये असा आमचा प्रयत्न आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. असं संकट यापूर्वी कधीच आलं नव्हतं. आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट आली तर 30 वयोगटातील आतील लोकांना अधिक धोका असेल असं टास्क फोर्सने स्पष्ट केलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यातच ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

…आता केंद्र सरकार कमी पडलं असा आरोप आम्हाला करायचा नाही- अशोक चव्हाण

काहींना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही- देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर म्हणून राज्याने स्वस्थ बसू नये- चंद्रकांत पाटील

“गोपीचंद पडळकर तळागाळातून आलेले, त्यांनी जे भोगलं ते त्यांनी पोटतिडकीने मांडलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More