देश

“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”

नवी दिल्ली | 3 कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. यानंतर बिहारमधील एका काँग्रेस नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही लस टोचवून घेत शंका दूर करावी, असं आवाहन केलं आहे.

ज्या प्रमाणे लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुरुवातीला लस टोचवून घेतली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची लस सुरुवातीलाच टोचवून घ्यावी, असं बिहार विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते अजित शर्मा यांनी म्हटलंय.

या लस निर्मितीचं श्रेय मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. पण सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्या काँग्रेसच्या काळात स्थापन करण्यात आल्या होत्या, असं शर्मा यांनी म्हटलंय.

दरम्यान, भारतात 3 कोरोना लसींना मंजुरी मिळाली आहे. देशात आणि जवळपास सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारीही पूर्ण झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

क्रूरतेचा कळस! सांगवीत एका पोत्यामध्ये घालून भटक्या कुत्र्याला पेटवून दिलं…

“संधीची वाटच पाहतोय, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू”

“केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी”

“उद्धव ठाकरे पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही”

“मी कोरोनाची लस घेणार नाही, कोरोनाचे किती अवतार येऊदे मला काही होणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या