लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली लाडक्या भावाचा छुपा प्रचार!

MukhyaMantri Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधारी पक्षांमध्येच स्थानित पातळीवर श्रेयवाद रंगला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्यात सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुती सरकारची योजना आहे. आता यावरून रत्नागिरी जिल्हयातलं राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

राजापूर आणि लांजा तालुक्यात गुरूवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) शुभारंभ सामंत यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादीसह महायुतीतील सहयोगी पक्षांना विश्वासात घेण्यात आलं नसल्याचं यशवंतराव म्हटलं आहे.

उदय सामंत हे या योजनेचा शुभारंभ करताना सत्तेतील सहयोगी पक्षांना विश्वासात न घेता आपलीच मनमानी करत आहेत. या योजनेच्या नावाखाली पालकमंत्र्यांकडून लाडक्या भावाचा छुपा प्रचार सुरू असल्याचा आरोप अजित यशवंतराव यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांकडून लाडक्या भावाचा छुपा प्रचार

या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात महायुतीतील सहयोगी पक्षांना सामंत यांनी डावलल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीमुळे ते राज्यात मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडल्याचा टोला यशवंतराव यांनी लगावला आहे.

या योजनेसह सर्वच योजना या राज्यातील महायुती सरकारकडून राबल्या जात आहेत. त्या काय सामंत यांच्या वैयक्तीक योजना आहेत काय?, असा सवालही यशवंतराव यांनी उपस्थित केला आहे. इतक्या घाईगडबडीत सहयोगी पक्षांना विश्वासात न घेता, कार्यक्रमांना न बोलावता सामंत हे कार्यक्रम करत आहेत हे नक्की कोणासाठी, एवढा आटापिटा का आणि कशासाठी, असा सवाल उपस्थित करून राज्यात महायुतीचं सरकार आहे याचा त्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतो, असा टोलाही यशवंतराव यांनी लगावला आहे.

आम्ही हे खपवून घेणार नाही- अजित यशवंतराव

ही मनमानी आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. सामंत यांनी त्यांच्या सोयीचे आणि स्वार्थाचं राजकारण बंद करावं. अन्यथा आम्हाला आमच्या पक्षनेतृत्वाशी बोलून यावर विचार करावा लागेल, असा इशाराही यशवंतराव यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ भागात पावसाचा हाहाकार; शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकली

सर्वसामान्यांना दणका! टोमॅटोचे दर गगनाला भिडले, एक किलोचा भाव तब्बल ‘इतके’ रुपये

सावधान! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा!

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणारी वारकऱ्यांची जीप थेट विहिरीत कोसळली; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू