बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत”

पुणे | पुणे – पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी चालू केली आहे. सर्व पक्ष राज्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या दोन्ही महापालिकांवर आपला झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखत आहेत. अशातच आता या निवडणुकांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला सहकारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला सूचक इशारा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले की, पालकमंत्री आपले नाहीत परंतु राज्यात आपली सत्ता आहे. इथं आपलं कोणीच ऐकत नाही, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्री आपले आहेत पालकमंत्री देखील आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल की, आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. परंतु थोडं थांबा चुकिची माहिती देऊ नका.

मुख्यमंत्री दिल्लीला तेथील अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे. मुख्यमंत्री कोण कुठे बसतात याचा अंदाज घेतायत. आपल्याला तिथं पोहचायचं आहे. यामुळे आपण अजित दादांशी बोलू, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी राऊत यांंनी भोसरीत शिवसेनेचा एकही नगरसेवक नसल्याची खंत देखील व्यक्त केली आहे. तसेच भोसरीत शिवसेनेनं कामाला सुरुवात करायला हवी, असं देखील राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“अजूनही मनुवादी जिवंत असल्यानं ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय’”

“भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार”

गेली 70 वर्षे ‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाची सत्ता येते

“हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा”

पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप; महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More