पुणे | नवीन वर्षाच्या सुरूवातील पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका मंचावर एकत्र आले. राजकारणातील मातब्बर नेते एकाच मंचावर म्हटलं की गरमागरमी होणारच.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. मात्र या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ‘एकच वादा अजितदादा’ तर भाजपचे कार्यकर्ते ‘पुण्याची ताकद गिरीष बापट’, अशा घोषणा देत होते.
दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कारण दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि जोरदार घोषणाबाजी करत होते.
थोडक्यात बातम्या-
‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’; बाळासाहेब थोरात म्हणाले….
“विचार करा कोरोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर?”
‘कबीर सिंग’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोनं खळबळ
कोरेगाव भीमा इतिहासाबाबत रामदास आठवलेंची नवी मागणी
कोरोना लशीच्या तात्काळ वापराला मंजुरी मिळणार?; तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू