Top News महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | पुण्यात रोज डे दिवशी पूजा चव्हाण या तरूणीने आत्महत्या केली होती. आत्महत्या कऱणाऱ्या तरूणीचा विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा होत आहे. यावर विरोधी पक्षानेही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्यांनी आरोप केला होता त्यांनी नंतर स्वतः चॅनेलसमोर येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझं स्टेटमेंट करतेय असं सांगितंल होतं. एखाद्या नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. मात्र आरोप करणारा कशाही पद्धतीने आरोप करू शकतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे प्रकरणात पहिल्यांदा आरोप करताना त्यांना कोणी आरोप करायला भाग पाडलं होतं का?, असे बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात मात्र ते प्रकरण आता मिटलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस चौकशी सुरू आहे चौकशी होऊ द्या जे काही आहे ते समोर येईल, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आरोप झाल्यावर त्या गोष्टीच्या खोलात गेलं पाहिजे. मात्र काही लोक चौकशीहोण्याआधीच आरोप करतात, असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

“मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळे मला काही अडचण येत नाही”

न्यूज चॅनेलवर बोलताना तोल सुटला, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुफान राडा!

सावधान ! ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर

बापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट!

BBCला सर्वात मोठा धक्का; ‘या’ देशाने प्रसारणावर आणली बंदी

हेक्टरनंतर आता नव्या गाडीचा जलवा; एमजी लाँच करतंय ‘ही’ जबरदस्त कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या