बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे आता देशाला नवा प्रतिभावान राष्ट्रपती देणे आहे. यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) म्हणजे भाजपने आदिवासी समाजातील नेत्या दौपदी मुर्मू (Draupdai Murmu) यांना उमेदवारी दिली आहे तर, सर्व विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे या लढाईत आहेत. भाजपने मुर्मू यांना निवडून आणण्यासाठी पुरेशे संख्याबळ एकत्र केले असले तरी, भाजपेत्तर पक्ष सिन्हांच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे ही राष्ट्रपतींची निवडणूक जोरदार होणर आहे.

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांच्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार अजॉय कुमार (Ajoy Kumar) यांनी टीका केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. कुमार यांनी राष्ट्रपतींच्या निवडणूकीसंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुमार म्हणाले, दौपदी मुर्मू एका दुष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

यशवंत सिन्हा एक चांगले उमेदवार आहेत आणि दौपदी मुर्मू देखील एक चांगल्या व्यक्ती आहेत. पण, त्या भारतातील एका दुष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आपण त्यांना आदिवासींचे प्रतिक (Idol) बनवता कामा नये. अशी प्रतिके तयार करुन भारतीय लोकांना मुर्ख बनविणे हेच तर मोदी सरकारचे काम आहे. ही निवडणूक देशाच्या आत्म्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन यशवंत सिन्हा यांना पाठींबा दिला पाहिजे, असे यावेळी अजॉय कुमार म्हणाले.

दरम्यान, कुमार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर देखील टीका केली. आपले सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत, मागच्या काही महिन्यांपूर्वीच्या काळात हाथरससारखी (Hathras) घटना घडली. त्यांनी त्यावर एख चकार शब्द काढला नाही. देशात अनुसूचित जातींची (Schedule Caste) परिस्थिती अजूनच वाईट झाली आहे, असे मत कुमार यांनी नोंदवले.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

लस घेतल्याने ‘या’ कॅन्सरचा धोका कमी होणार, अदर पूनावाला यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

लिंबू पाणी जितकं प्रभावी तितकंच घातकही, उद्भवू शकतात ‘हे’ सहा आजार

‘राजनाथ सिंह यांचा फोन आला आणि मला म्हणाले अस्सलाम वालेकुम’ -उद्धव ठाकरे

श्रीलंकेत जनक्षोभ, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळाले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More