बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नानांच्या आरोपावर अजित पवार संतापले; म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा नेते आणि मंत्री करत आहेत. मात्र काहीतरी गडबड झाल्याचं दिसत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

नाना पटोले मंत्री किंवा नेते नाहीत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नानांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला सुरूंग लावला जात आहे. नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला कमकुवत करणारी असून महाविकास आघाडीला अडचणीत आणणारीही आहे, असं म्हणत अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांअगोदर मंत्री नवाब मलिक यांनीही नानांवर टीका केली आहे.

दरम्यान, आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

शिवसेना नेते संजय राऊत रॉकस्टार- उर्मिला मातोंडकर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर नाना पटोलेंनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

“रोहित पवार एकदा मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

“नाना पटोले यांच्या वक्तव्यांवरून महाविकास आघाडीमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे दिसून येते”

“केंद्रातील सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More