शिवसेना, टीडीपीनंतर अकाली दलही नाराज, मोदींवर आक्षेप!

नवी दिल्ली | शिवसेना, टीडीपीनंतर भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलानंही भाजविरोधातील नाराजी बोलून दाखवलीय. त्यामुळे आगामी काळात मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते मित्रपक्षांना सोबत घेऊन चालत होते. मात्र मोदी मित्रपक्षांना महत्त्व देत नाहीत,’ असा आरोप अकाली दलाचे खासदार सुखदेव ढींढसा यांनी केलाय. ढींढसा वाजपेयी सरकारमध्ये क्रीडा आणि रसायनमंत्री होते.

पंजाबच्या 13 लोकसभांपैकी 4 जागांवर अकाली दल तर एका जागेवर भाजपचा खासदार आहे. त्यामुळे नाराजी वाढत गेली तर आगामी लोकसभेत मोदींचा अडचणींचा सामना करावा लागेल.