“…तर धोनीच्या संघाचं काही खरं नाही”; दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
मुंबई | आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ खेळता आला नाही. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात चेन्नई संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यानंतर आता दिग्गज समालोचक आकाश चोप्रा यांनी चेन्नईच्या पुढील वाटचालीवर भाष्य केलं आहे.
पुढील सामन्यांमध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाडनं चांगला खेळं दाखवणं गरजेचं आहे. ऋतुराज चांगला खेळला नाही तर या टीमचं काहीही होणार नाही मी तुम्हाला लिहून देतो, असं चोप्रा म्हणाले आहेत. परिणामी आता चोप्रा यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.
चेन्नईचा चौथा सामना सनराईझर्स हैदराबाद संघासोबत आहे. या सामन्यात ऋतुराजनं चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, असं चोप्रा म्हणाले आहेत. ऋतुराज गायकवाडनं गेल्या हंगामात सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या. चेन्नईच्या विजयात ऋतुराजनं मोलाचा वाटा उचलला होता.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज संघ यावेळी राॅबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर जास्त अवलंबून आहे. तर मोईन अलीदेखील मोक्याच्या क्षणी धावा काढण्यात यशस्वी ठरण्याची अपेक्षा चेन्नईला आहे.
थोडक्यात बातम्या
गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने शरद पवारांवर केलेल्या आरोपाने खळबळ
“शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”
18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार बूस्टर डोस, मोजावे लागणार ‘इतके’ रूपये
पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त 100 रूपयांपासून करू शकता गुंतवणूक
‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’, शरद पवारांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Comments are closed.