बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आकाश ठोसरने शेअर केला कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ, म्हणाला…

मुंबई | सैराट फेम परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो लाल मातीत कुस्ती खेळत असल्याचं दिसतं आहे. तर त्याच व्हिडिओमध्ये शुटींग देखील होत असल्याचं चित्रण दिसत आहे. यात आकाशनं समोरच्या पैलवानाला लोळवलेलं दिसत आहे.

लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडिलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत 5 वर्ष काढली. ‘तालीम’ जोर, बैठका, डावपेच, शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली. तालमीतलं हसतं-खेळतं वातावरण, एकाच ध्येयाने पेटून उठलेले पैलवान सवंगडी, रोज न चुकता करायचा सराव, गप्पा-गोष्टी अशा सगळ्या आठवणी अजूनही सोबत आहेत, असं आकाश ठोसर म्हणाला आहे.

लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे. आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो. या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा, पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आणि त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय. मातीशी हे माझं नातं असचं घट्ट राहील. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला या मातीत रुजायला, खेळायला आणि लढायला शिकवलं त्या सर्व माझ्या मातीतल्या माणसांना प्रणाम आणि धन्यवाद, अशी भावनिक पोस्ट आकाशनं त्याच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटला लिहिली आहे.

दरम्यान, अभिनेता आकाश ठोसर नुकताच ‘1965 द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये तो एका सैनिकाची भूमिका साकारत आहे. त्यानंतर तो आता कुस्ती खेळताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…

विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

‘…म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’; केंद्रीय पथकाने सांगितलं कारण

नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणतात…

‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’; जयंत पाटलांसाठी समर्थकांनी शेअर केला व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More