Top News

अकबरूद्दीन ओवैसी यांची प्रकृती चिंताजनक; असदुद्दीन यांचं प्रार्थना करण्याचं आवाहन

मुंबई | एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे छोटे बंधू आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत, असं वृत्त ‘द हिंदू’ने दिलं आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी बंधू अकबरूद्दीन यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं त्यांच्या समर्थकांना आवाहन केलंय.

सुरूवातीला त्यांच्यावर तेलंगणात उपचार चालू होते. मात्र तेथील रूग्णालयात त्यांना फरक न जाणवल्याने त्यांना तात्काळ लंडनला हलविण्यात आले.

अकबरूद्दीन ओवैसी हे तेलंगणा विधानसभेत आमदार आहेत. एमआयएमकडून ते हैदराबादमधून निवडून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या डोक्यात ‘हा’ प्लॅन

-“पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केलाय”

-खैरेंना धूळ चारलेल्या जलीलांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

-जागावाटपावरून सेना-भाजपात धुसफूस; त्यात आता आठवले म्हणतात मला ‘एवढ्या’ जागा दया

-पक्षाच्या वर्धापनदिनी रोहित पवार म्हणतात, भाकरीच नाही तर पीठसुद्धा बदलायची गरज…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या