“भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा, तितकाच दाढीवाल्यांचाही”

Akbaruddin Owaisi | एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi)यांची काल (5 नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सभा झाली. याच सभेत त्यांनी महायुतीसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपची विचारधारा असणाऱ्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हिंदुत्त्व शिकवण्यात यशस्वी झाले का?, असा सवाल उपस्थित केला. (Akbaruddin Owaisi)

“हा देश सर्व धर्मातील लोकांचा आहे. हा देश मोदी आणि योगींचा आहे, तितकाच माझाही आहे. भाजप मागील 10 वर्षांपासून हिंदू-मुस्लिम राजकारण करत आहे. योगी म्हणतात ‘काटेंगे तो बटेंगे’ बीफ, घरवापसी नावावर तुम्ही जे कापत आहे, त्यामुळे देश कमजोर होत नाही का?, हा देश योगी यांचा नसून सर्वांचा आहे. टिळा लावणारे, पगडी बांधणारे आणि दाढी ठेवणारे या सर्वांचा हा देश आहे”, असं अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले.

अकबरुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य

देशात बेरोजगारी, महागाई, महिलांविरोधात होणारे अत्याचार असे अनेक प्रश्न आहेत. पण, या देशाला जातीच्या नावावरून वाटले जात आहे. योगी आदित्यनाथ मुस्लिम असा मुस्लिम तसा, मुस्लिमांच्या एवढ्या पत्नी यावर ते बोलतात. योगी जातीचं राजकारण करणार नाही असे का सांगत नाहीत?, असा सवाल देखील ओवेसी यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणसंबंधी देखील मोठं भाष्य केलं. मराठा आरक्षणसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना आमचा पाठिंबा आहे. देशात अत्याचार मुस्लिम, दलित यांच्यावर होतात. त्यामुळे मराठा , दलित, मुस्लिम एकत्र येऊन अत्याचार विरोधात लढू, असं अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत. (Akbaruddin Owaisi)

ओवेसी यांचा मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा

जरांगे यांनाही सांगतो की, फक्त मराठा समाज मागास नाही, तर संपूर्ण मराठवाडा मागास आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे आरक्षण सोबत मराठवाड्याच्या विकासाठी पुढे येऊ. मी मराठवाडा विकाससाठी 50 हजार करोडची मागणी करतोय. शहराचे नाव बदलून पोळी मिळणार आहे का, शेतकरी आत्महत्या थांबणार आहेत का?, असा संतप्त सवाल करत त्यांनी (Akbaruddin Owaisi)महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

News Title :  Akbaruddin Owaisi Big Statement

महत्वाच्या बातम्या –

लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये?, मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

स्वामींच्या कृपेने आज कुणाची मनोकामना पूर्ण होणार?, वाचा राशीभविष्य

‘सलमान सोबतच्या वन नाईट स्टँडला कंटाळून…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं

चांदणी चौकातील समस्या कशी सुटली?, चंद्रकांत पाटलांनी शेअर केला व्हिडीओ

उद्धव ठाकरेंनी दिली पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं!