प्रतिष्ठेच्या लढाईत MIMचे अकबरुद्दीन ओवैसी विजयी

हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काही मोठे निकाल हाती येत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरूद्दीन ओवेसी यांचा विजय झाला आहे. 

गुट्टा या मतदारसंघातून त्यांचा विजय झाला आहे. ही लढाई खूपच प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र ओवैसींनी याठिकाणी बाजी मारली आहे. 

तेलंगणा विधानसभेत 119 जागांसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. टीआरएस या राज्यामध्ये मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. 

दरम्यान, तेलंगणामध्ये टीआरएस सत्तेवर येण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर राव यांना जनतेने पुन्हा कौल दिल्याचं दिसतंय. 

महत्वाच्या बातम्या –

-धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

-भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

-भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता

-काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर