“कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या”
मुंबई | मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा अद्यापही सुरु असून यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टार्गेट केलं जात असून त्यांच्यावर अनेक टीकास्त्र सोडलं जात आहे. अशातच आता एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
औवेसींनी राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या. कुत्र्याचं काम भुंकण्याचं आहे. वाघाचं काम शांतपणे चाललं जाणं आहे. बस भुंकू द्या, असं औवसींनी म्हटलं आहे.
अकबरुद्दीन औवेसी पुढे म्हणाले की, वेळ आणि परिस्थीला समजा. त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाहीय. ते जाळ गुंफत आहेत. ते तुम्हाला जाळ्यात फसवू इच्छित आहेत. तुम्ही फसू नका.
दरम्यान, देशात द्वेष पसरवला जातोय. पण मी प्रेम पासरवतो. कुणाला घाबरण्याची गरज नाही. ज्याला कुणाला वाटत असेल आम्ही घाबरू पण ऐकून घ्या, आम्ही घाबरणार नाही. इस्लाम आधी नाही संपला आता कोण संपवणार?, असंही अकबरुद्दीन यांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
“महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही”
गुड न्यूज! यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘…म्हणून माझं लग्न होत नाहीये’; कंगनानं स्पष्टच सांगितलं
…म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम
भाजपला मोठा झटका?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता
Comments are closed.