महाराष्ट्र मुंबई

“राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”

मुंबई | ॲमेझाॅनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्याबाबत मनसेने मागणी केली होती. या प्रकरणी अ‍ॅमेझॉनने थेट न्यायालयात धाव घेतली. यानंतर दिंडोशी न्यायालयाकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलीये.

राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया मनसे नेते अखिल चित्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.

मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे, असं अखिल चित्रे म्हणाले.

न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही- आनंद दवे

“राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नाहीत, त्यांच्यात हे सत्य स्वीकारण्याचं धाडस नाही”

“निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात”

ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार?

‘माझ्यावर दडपण होतं पण जर मी खचलो तर…’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘त्या’ दिवसांमधला अनुभव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या