देश

आता झाडं वाचवणंही गुन्हा ठरतोय- अखिलेश यादव

Loading...

लखनऊ | आज वृक्ष वाचवणंही गुन्हा ठरत आहे, उद्या देशद्रोही असल्याचा आरोपही करतील. भाजपला पर्यावरण वाचविणाऱ्या लोकांपासून धोका वाटत आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर एकीकडे पर्यावरणाच्या गोष्टी करतात आणि देशात वृक्षतोड करतात, असं म्हणत सपाचे नेते अखिलेश यादव यांनी आरेमधील वृक्षतोड प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे.

आंतरराष्ट्रीय मंचावर एकीकडे पर्यावरणाच्या गोष्टी करतात आणि देशात वृक्षतोड करतात. गांधींनी सांगितलं होतं, की जंगलासोबतचा मानसाचा व्यवहार त्याची मानसिकता दाखवितो, असं यादव यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील आरे जंगलामध्ये मेट्रोची कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी हजारो वृक्षांची कत्तल शनिवारी करण्यात आली. याला विरोध करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर वृक्षतोडीवरून टीका होत असताना आता राष्ट्रीय स्तरावरही टीका होऊ लागली आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी दुटप्पी भुमिका घेतली आहे. अखिलेश यादव यांच्यासह जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी देखील वृक्षतोडीचा निषेध नोंदविला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-   

 

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या