उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. मात्र तरी देखील युपीमध्ये राजकारण तापल्याचं दिसून येतंय. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांदी भाजपवर निशाणा साधलाय.
अखिलेश यादव म्हणाले, “भाजप पक्ष हा दिवाळी साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढते. युपीमध्ये कोणत्याही प्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने नोटबंदी केली होती. शिवाय भाजपाने देशातील जनतेची निराशा केली आणि विश्वासघातही केलाय.”
यापूर्वी देखील अखिलेश यादव यांनी तिकिटासाठी येणाऱ्या खर्चावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले होते.
दरम्यान समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीला धक्का दिलाय. बसपा नेते कैलास नाथ सिंह यादव यांच्यासह अनेक नेते समाजवादी पार्टीत दाखल झालेत.
महत्वाच्या बातम्या-
“पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी”
बिहार निवडणूक निकाल- चिराग पासवान किंग मेकर ठरणार का?
पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा
बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी
बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत