उत्तर प्रदेशमध्ये छ. शिवरायांच्या नावाने भव्य उद्यान उभारणार!

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने भव्य उद्यान उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केलीय. सायनच्या सोमय्या मैदानात आयोजित ‘देश बचाओ, देश बनाओ’ महारॅलीत ते बोलत होते.

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन समाजवादी पक्षाने तयारी सुरु केलीय. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये ही महारॅली आयोजित करण्यात आली होती. 

नोदाबंदीमुळे दहशतवादाला आळा बसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, मात्र ती समस्या अजूनही तशीच आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा नोटाबंदी करणार का? असा सवाल त्यांनी विचारला.