Akhilesh Yadav | आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक ट्विस्ट घडताना दिसले आहेत. कुठे मतदान हे अगदी धिम्या गतीने होताना दिसत होते. तसेच काही ठिकाणी मतदान केंद्रावरील बुथवर ईव्हीएम मशीन बंद असल्याची माहिती समोर आली. यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला. दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये एक अशी घटना समोर आली आही जी ऐकताच कोणीही संताप व्यक्त करेल.
उत्तरप्रदेशमधील एका युवकाने भाजपला आठ वेळा केलं मतदान :
उत्तरप्रदेशमध्ये (Akhilesh Yadav) एका युवकाने भाजपला तब्बल एक ते दोन वेळा नाही तर तब्बल आठ वेळा मतदान केलं आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याच्या नयागाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रकार घडला आहे. याप्रकरणात 171-एफ आणि 419, तसेच आरपी अॅक्टच्या कलम 128, 132 आणि 136 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे या ठिकाणचे मतदान पुन्हा करण्यात यावं असं निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे. (Akhilesh Yadav)
अखिलेश यादव यांच्याकडून पोस्ट व्हायरल :
सलग आठ वेळा युवकाने भाजपला मतदान केल्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील अनिल सिंह असून तो खिरीया पमारान गावचा रहिवासी आहे. संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित युवकाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात तसेच प्रशासनात खळबळ उडाली आहे. कथित व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या या तरूणाने भाजपला मत देताना दिसत आहे. हा व्हिडीओ समाजवादीचे पार्टीचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट केलं आहे.
अगर चुनाव आयोग को लगे कि ये गलत हुआ है तो वो कुछ कार्रवाई ज़रूर करे, नहीं तो…
भाजपा की बूथ कमेटी, दरअसल लूट कमेटी है। #नहीं_चाहिए_भाजपा pic.twitter.com/8gwJ4wHAdw
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 19, 2024
आखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केलेलं ट्विट सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने जर यात काही चूक झाली असेल तर जरूर कारवाई करावी असं आपल्या पोस्टच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.
News Title – Akhilesh Yadav Share Post Young Man 8 Time Vote To BJP
महत्त्वाच्या बातम्या
संकट काळात ‘याच’ गोष्टी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील!
“शाहरूख आणि करण जोहरचे माझ्या पतीसोबत होते समलैंगिक संबंध”, गायिकेचा धक्कादायक दावा
रूपाली चाकणकरांनंतर शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल
अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच मुंबईमध्ये बजावला मतदानाचा अधिकार, म्हणाली…
“रात्री 11 वाजले तरीही चालेल पण मतदान करूनच जाणार,” जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात गोंधळ