उत्तर प्रदेशात सोमवारचा दिवस प्रियांका गांधींचा तर आजचा अखिलेश यादवांचा

लखनऊ | काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या रोड शोला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळं सोमवारचा दिवस गाजला होता. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना प्रयागराज येथे जाण्यापासून रोखण्यात आल्यानं आज उत्तर प्रदेश चर्चेत आहे.

अलाहाबाद विद्यापीठातील एका कार्यक्रमासाठी अखिलेश यादव प्रयागराजला जाणार होते मात्र त्यांना लखनऊ विमानतळावरचं पोलिसांकडून रोखण्यात आलं.

अखिलेश यादव यांना प्रयागराजला जाण्यापासून थांबवण्यात आल्यानं उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.

दरम्यान, समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे पुतळे जाळले आणि त्यांच्या पोस्टरला काळं फासलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका- निलेश राणे

काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप

भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

Google+ Linkedin