18301234 763990163768106 2232795083457095401 n - वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याच्या ३ शेळ्या २ बोकड दगावले
- सोलापूर

वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याच्या ३ शेळ्या २ बोकड दगावले

अक्कलकोट | बोरगाव दे. गावात वाऱ्याने पत्रे उडाल्याने नामदेव विठ्ठल कोळी या शेतकऱ्याच्या ३ शेळ्या आणि २ बोकड यांचा विजेचा धक्का लागून दगावले. काल रात्री दोन वाजता ही घटना घडली. वाऱ्याने उडालेला पत्रा मीटर मधून बाहेर आलेल्या वायरवर आदळल्याने पत्र्यात करंट शिरला. त्यामुळे विजेचा धक्का बसून शेळ्या दगावल्या.
 
फोटो आणि माहिती सौजन्य- Siddu Khed
या बातमीवर तुमची कमेंट लिहा