जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे आपल्या आवडत्या खासदार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं. त्यानंतर, चांगल्या कामाची दखल घेतली, तर राजकारणात चांगले दिवस येतील, अशा भावना एकनाथ खडसेंनी व्यक्त केल्या आहेत.
रक्षा खडसे आणि सुप्रिया सुळे संसदेत एकत्र काम करतात. राजकारण्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं आहे. सुप्रियाताईंनी चांगलं काम केलं. आम्ही त्यांचं नेहमी कौतुक करत आलेलो आहोत. असं मत एकनाथ खडसेंनी मांडलं.
काही गोष्टी या राजकारणापलिकडच्या असतात. योग्य कामाची दखल घेतली पाहिजे. त्यात राजकारण आडवं येता कामा नये. चांगल्या कामाची जर दखल घेतली, तर राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ शकतात, असंही एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले.
दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 48 खासदारांपैकी आवडतं कोण? हा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी जळगावचा आवाज संसदेत मांडणाऱ्या रक्षा खडसे आपल्या आवडत्या महिला खासदार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी दिल्याबद्दल केजरीवालांचे आभार- कन्हैया कुमार
“ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेचा ठराव केंद्राने फेटाळला”
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच केलं फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले…
जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
‘कोरोना’मुळे महाराष्ट्रातील 600 यात्रेकरु इराणमध्ये अडकले
Comments are closed.