Akola crime | राज्यात बदलापूर येथील शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटले. बदलापूर येथे संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करत तोडफोड केली. ही घटना ताजी असतानाच आता अकोल्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Akola crime)
अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या वर्गशिक्षकाने 6 मुलींना अगोदर अश्लील व्हिडिओ दाखवले.
अकोल्यातील वर्गशिक्षकाकडून लैंगिक छळ
हा वर्गशिक्षक गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्यांच्याशी अश्लील गप्पादेखील मारायचा. या प्रकरणी शिक्षकावर पॉस्को सह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या आरोपी शिक्षकावर काल मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. घडलेला सर्व प्रकार मुलींनी घरी पालकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. पालकांनी थेट उरळ पोलिस ठाण्यात जात नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दिली. (Akola crime)
बदलापूरनंतर पुण्यातही घडला धक्कादायक प्रकार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी लगेच 6 मुलींचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. सध्या हा आरोपी शिक्षक पोलिसांच्या अटकेत असून त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Akola crime)
अशात पुण्यातूनही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच एका विद्यार्थ्याने स्वच्छतागृहात येऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीये. 15 ऑगस्टरोजी हा सर्व प्रकार घडला. या संपूर्ण प्रकरणी आता अधिक तपास देखील सुरू आहे.
News Title – Akola crime Sexual harassment by class teacher
महत्त्वाच्या बातम्या-
आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प?, जाणून घ्या सविस्तर
आज ‘या’ 3 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल!
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
बदलापूर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द?, बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर; मंत्री अदिती तटकरे आक्रमक
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार?