अकोला | अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाभरात संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अनलाॅक झाल्यापासून परत टाळेबंदी करणारा हा महाराष्ट्रातील दुसरा जिल्हा आहे. याआधी अमरावती जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते.
अकोला जिल्ह्यात जारी केलेल्या संचारबंदी आदेशानुसार आता इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांंना अकोला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. जिल्ह्याच्या सर्व सीमांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले आहे.
संचारबंदीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याचे जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे. जनतेनं घाबरून न जाता घरातच राहण्याचं आवाहनही त्यांंनी केलं आहे. नवीन वर्षात संपूर्ण राज्यातील कोरोना रुग्णांचा चढता आलेख उतरताना दिसत होता, तोच आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्याने पुन्हा उसळी मारली आहे.
आधी अमरावती आणि आता अकोला येथे लागू झालेल्या आदेशानंतर आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही हा आदेश लागू होणार का? आणि कोरोनाची लस आली असताना देखील रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे, त्यामुळे पुढील काळात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येणार का? हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
थोडक्यात बातम्या-
…तर कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांनी दिले मोठे संकेत
मुंबई-पुण्यानंतर महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोरोनाचा कहर सुरु
मंत्र्याकडून संसदेतच बलात्काराचा प्रयत्न, महिलेच्या आरोपानं एकच खळबळ
‘कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप’; खासदार नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा
‘पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर…’; रक्षा खडसे आक्रमक