बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अकोला विधान परिषद निवडणूक: अकोल्यातही भाजपचा झेंडा, महाविकास आघाडीला मोठा धक्का

अकोला | नागपूर पाठोपाठ अकोला विधान परिषद जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा (Akola Legislative council Election) निकाल समोर आला आहे. या निवडणुकीतही भाजप अग्रेसर असल्याचं पहायला मिळालं. अकोला बुलडाणा-वाशीम या जागेवर विधानपरिषद निवडणूक  घेण्यात आली. यामध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे.

भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव केला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल  (BJP Vasant Khandelwal) यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. विजयाची हॅट्रीक केलेले गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी 443 मतांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास मते फुटली असल्याचं दिसत आहे. भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी ही निवडणूक 110 मतांनी जिंकली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे जवळपास 80 मते फुटली असल्याचे समोर आलंय. त्याशिवाय 31 मते अवैध ठरली. त्यामुळे सध्या विधान परिषद निवडणूकीवरुन एकच खळबळ पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचा काॅंग्रेसवर दणदणीत विजय, बावनकुळे पुन्हा आमदार

धक्कादायक! म्हाडा पेपर फोडण्यासाठी ‘या’ खास कोडवर्डचा केला वापर

अजब लग्नाची गजब वरात! नवरदेवाला घेऊन घोडा फरार, पाहा व्हिडीओ

आज इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘….तर अशांना महाराष्ट्र सरकार खपवून घेणार नाही’; सुप्रिया सुळे आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More