बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अक्षय बोराडे पुन्हा अडचणीत, पत्नीनंतर तरूणीने केला मोठा गुन्हा दाखल

पुणे | मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी अक्षयची पत्नी रूपाली बोऱ्हाडे यांनी अक्षय आणि त्याच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र अशातच अक्षय बोऱ्हाडेवर एका तरूणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाचं अमिष दाखवत आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. याबाबत तरूणीने जुन्नर पोलीस स्टेशनमजध्ये तक्रार दाखल केली आहे. अक्षयवर आधीच त्याची पत्नी आणि नगरसेवक, एचपी गॅस वितरक रूपेश शहा यांनी गंभीर आरोप केले आहेत.

अक्षयने आपल्याला खंडणी मागितली असल्याचा आरोप रूपेश शहा यांनी केला होता. तर पत्नी रूपाली यांनी, अक्षयने अनेक मुलींची फसवणुक केली आहे, तो काही काम करत नाही आणि प्रतिष्ठानच्या आलेल्या निधीचा चैनीसाठी वापरतो आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे आरोप अक्षयवर केले आहेत.

दरम्यान, अक्षयची आई, भाऊ यांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मोठ्या प्रमाणात आपला छळ केल्याचाही आरोप केला आहे. त्यासोबत काही रूग्णांना रात्री घेऊन जायचा मात्र ते रूग्ण परत दिसले नाहीत त्यांचं काय झालं माहित नाही, असंही रूपाली बोऱ्हाडे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-  

सत्ता स्थापनेच्या कार्यक्रमात तालिबाननं दिलं ‘या’ सहा देशांना निमंत्रण, भारताच्या कट्टर शत्रूराष्ट्रांचा समावेश!

“मुंडेने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी नियती त्याला सोडणार नाही”

‘… त्यांना लाज कशी वाटत नाही’; बेळगाव महापालिकेच्या निकालानंतर राऊत भडकले

14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार, पुण्यातील घटनेनं खळबळ!

पुणे तिथे काय उणे! पुण्यात साडी फक्त नेसत नाहीत तर खातातही, नक्की काय ते जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More