‘त्या’ जाहिरातीवरून अक्षय कुमारने मागितली चाहत्यांची माफी, म्हणाला…
मुंबई | बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) काही दिवसांपूर्वी पान मसाल्याचा जाहिरातीत झळकल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अक्षय कुमारने तंबाखूची जाहिरात केल्याने नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं.
अक्षयने समाजासाठी घातक ठरणाऱ्या जाहिराती स्विकारू नये, असं मत अक्षयच्या चाहत्यांनी व्यक्त केलं होतं. चाहत्यांच्या नाराजीवर अक्षय कुमारने अखेर मौन सोडलं आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे.
मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या तुमच्या प्रतिक्रियेचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिलं नाही आणि यापुढेही देणार नाही. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो, असं अक्षय कुमारने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, मी या जाहिरातीतून माघार घेत आहे. मात्र, माझी या ब्रँडसोबत कराराची मर्यादा संपत नाही तोपर्यंत ही जाहिरात प्रसारित होईल, असं अक्षय कुमारने स्पष्ट केलं आहे. तर या जाहिरातीतून मिळालेले पैसे चांगल्या कामासाठी देईन व यापुढचं काम काळजीपूर्वक निवडेल, असं वचन अक्षयने चाहत्यांना दिलं आहे. याच्याबदल्यात चाहत्यांचं प्रेम असंच कायम राहिल, अशी इच्छाही अक्षयने व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
‘पैसे द्या नाहीतर…’, धनंजय मुंडेंना महिलेने दिली धमकी
राज्यातील कोरोना स्थितीबाबत राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
‘त्या’ बैठकीला राज ठाकरेही हजेरी लावणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…
Netflix ला मोठा झटका! ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
Comments are closed.