Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका

Photo Courtesy- Facebook/Uddhav Thackeray & Suryanshi Cinema Poster

मुंबई | बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या भाजपसोबत असलेल्या जवळीकीसाठी ओळखला जातो. मात्र आता हीच जवळीक त्याच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजप आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या शिवसेनेचे संबंध अलिकडच्या काळात चांगलेच ताणले गेले आहेत आणि अक्षयच्या व्यावसायिक गणितांसाठी ते अत्यंत धोकादायक मानलं जातंय.

भाजप आणि शिवसेनेच्या ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी कंगणा नावाच्या प्रकरणाने चांगलंच तेल पडलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूडला पर्याय निर्माण करण्याच्या हालचाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून झाल्या, त्यांनी यासंदर्भात मुंबईत एक दौराही केला होता. या दरम्यान काही कलाकार, दिग्दर्शक तसेच निर्मात्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या होत्या.

आदित्यनाथ मुंबईत आले तेव्हा शिवसेनेनं त्यांच्यावर जोरदार टीका केली केली होती. बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवण्याचा आदित्यनाथांचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच हा डाव हाणून पाडून असं शिवसेनेनं म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर अक्षय कुमारचे योगी आदित्यनाथांची भेट घेतली होती. यामुळे ठाकरे सरकारची वक्रदृष्टी अक्षय कुमारवर असल्याचं बोललं जात आहे.

नुकताच शिवसेनेनं नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता. शिवसेना खासदारा आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आंदोलनस्थळी जाऊन भाजपविरोधात शंख फुंकला होता. या प्रकरणातही काही सेलिब्रेटींनी मोदी सरकारची बाजू घेणारे ट्विट केले होते. यामध्ये अक्षय कुमारचा समावेश होता.

साऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमार भाजपसाठी हिरो ठरत असला तरी शिवसेनेसाठी मात्र तो व्हिलन ठरताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात व्यावसायिक पार्श्वभूमीवर त्याची अडवणूक केली जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. कंगणाला जसं शिवसेनेनं सरेआम शिंगावर घेतलं होतं, तशा पद्धतीने नव्हे मात्र अक्षयला आडमार्गाने त्रास सहन करावा लागू शकतं असं मानलं जात आहे.

आगामी सिनेमांना त्रास होणार?-

सिनेमागृहं पूर्ण क्षमतेनं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार अद्यापही यावर विचार करत असल्याची माहिती आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा एप्रिलमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमागृहे पूर्ण क्षमतेनं उघडल्यावरच हा सिनेमा प्रदर्शित व्हावा, असं निर्मात्यांचं मत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर आता या सिनेमाचं भवितव्य आहे.

रिलायन्स एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंह तसेच अजय देवगण, कतरिना कैफ, गुलशन ग्रोहर, जॅकी श्रॉफ अशी स्टारकास्ट यात पहायला मिळणार आहे. भन्नाट सिनेमांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टींनं या सिनेमाचं दिगदर्शन केलेलं आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

अक्षयच्या आईचा लागलाय पैसा-

सूर्यवंशी सिनेमात अक्षय कुमारने स्वतः तर पैसे लावलेलेच आहेत, याशिवाय त्याची आई अरुणा भाटीया यांचा पैसाही लागलेला आहे. याशिवाय करण जोहरचे पैसेही या सिनेमात लागलेले आहेत. त्यामुळे सिनेमा चांगला चालला तर अक्षय कुमारला दुहेरी फायदा होणार आहे. चित्रपटगृहं पूर्ण क्षमतेनं सुरु झाली नाहीत तर मोठा तोटा सहन करावा लागेल, असं निर्मात्यांना वाटत आहे.

शिवसेनेची पंगा महागात पडतोच-

शिवसेनेशी पंगा घेतला की तो महागात पडतोच, असं सध्या तरी चित्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. कंगणा राणावत प्रकरण असो वा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी… प्रत्येकाला शिवसेनेशी उडत असलेले खटके चांगलेच महागात पडलेले पहायला मिळाले आहेत. अक्षय कुमारनं थेट शिवसेनेशी अजून तरी पंगा घेतलेला नाही, मात्र त्याच्या भूमिका वेळोवेळी भाजपला फायदा देणाऱ्या असतात, या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षपणे अक्षयला त्रास सहन करावा लागू शकतो.

थोडक्यात बातम्या-

सचिनच्या मुलाचं काय होणार?; आज होणार महत्त्वाचा फैसला

‘या’ गावात सरपंच झाला की माणूस मरतोच म्हणायचे; महिलेनं घेतला धाडसी निर्णय!

शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!

पोलिसांची धडक कारवाई, 10 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या!

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या