Top News देश

नरेंद्र मोदींचं आर्थिक मदतीचं आवाहन; एका तासाच्या आत अक्षय कुमारची 25 कोटींची मदत!

Loading...

नवी दिल्ली |  कोरोनाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे, असं आवाहन करणारं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला एका तासाच्या आत अभिनेता अक्षय कुमारने प्रतिसाद देत कोरोनाच्या लढाईत योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे. (Akshay Kumar Donates 25 Crore Rupees to Pm Cares Fund)

अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबत त्याने ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहायता निधीमध्ये मी २५ कोटी रुपये देत आहे. चला आयुष्य वाचवूया. जान है तो जहाँ है, असं ट्विट त्याने केलं आहे. (Akshay Kumar Donates 25 Crore Rupees to Pm Cares Fund)

या काळामध्ये आपल्या लोकांच्या जीवाचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. यासाठी आपल्याला सगळं काही केलं पाहिजे, असंही अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, उद्योगपती रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनीही कोरोनाविरोधातल्या लढाईत आपलं योगदान दिलं आहे.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे

महत्वाच्या बातम्या-

आपल्याला कोरोनाला हरवायचंय… आर्थिक मदत करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन

देशसेवेची हीच वेळ… दानशूर रतन टाटांनी केली 500 कोटींची मदत

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या