विद्यार्थिंनींना 5 रुपयात सॅनिटरी पॅड, अक्षयच्या ‘पॅडमॅन’चा प्रभाव

विद्यार्थिंनींना 5 रुपयात सॅनिटरी पॅड, अक्षयच्या ‘पॅडमॅन’चा प्रभाव

मुंबई | 11 ते 19 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थिनींना 5 रूपयांत सॅनिटरी नॅपकीन मिळणार आहेत. राज्य सरकारने अस्मिता स्वच्छता आणि आरोग्याचा आवाम या योजनेद्वारे हा निर्णय घेतलाय.

या योजनेचा हेतू किशोरवयीन मुलींचं आरोग्य जपणं हा आहे. ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध होत नसल्यामुळे या योजनेमार्फत आता ते सहज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

पॅडमॅन या चित्रपटात महिलांसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल अक्षय कुमारला ‘अस्मिता’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे उपस्थित होते.

 

 

Google+ Linkedin