मुंबई | कोरोनाने सध्या भारतासह सर्व जगभरात हैदोस घातला आहे. कोरोनाच्या लढाईविरूद्ध विजय संपादन करण्यासाठी अनेक बॉलिवुड कलाकार पुढे सरसावत आहेत. अशातच अभिनेता खिलाडी अक्षय कुमारने मुंबई महापालिकेसाठी 3 कोटींची मदत केली आहे.
अक्षय कुमारने याआधी पंतप्रधान मदतनिधीला 25 कोटी रुपयांची मदत केली होती आणि आता सामाजिक भान जपत आणखीन मुंबई महापालिकेसाठी 3 कोटींची मदत केली आहे. त्यासोबत अक्षयने ही मदत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित मास्क मिळावा आणि टेस्टिंग किट्ससाठी मदत केली असल्याची माहिती आहे.
कोरोना विषाणूला हरवण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. अशा कठीण प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचं काम करत आहेत.
दरम्यान, अभिनेता शाहरुख खाननेही बीएमसीला त्याची 4 मजली ऑफीसची इमारत क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी ऑफर केली आहे. तसेच, शाहरुखने अनेक ठिकाणी आर्थिक मदत करुन कोरोनाग्रस्तांची मदत केली आहे.
Name : Akshay Kumar
City : MumbaiMere aur mere parivaar ki taraf se…
Police, Nagar Nigam ke workers, doctors, nurses, NGOs, volunteers, government officials, vendors, building ke guards ko #DilSeThankYou 🙏🏻 pic.twitter.com/N8dnb4Na63— Akshay Kumar (@akshaykumar) April 9, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ
वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!
महत्वाच्या बातम्या-
कोणतंही काम सोपं नसतं, वडिलांचे केस स्वत: कापले- सत्यजीत तांबे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचा रसिकांना संदेश. . .
Comments are closed.