मनोरंजन

अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

मुंबई | कोरोनाच्या संकटात अनेक जण शक्य असेल ती मदत करत आहे. या मदतीच्या हातांमध्ये चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते आघाडीवर आहेत. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. चित्रपटांबरोबरच तो सामाजिक कार्यातही खूप पुढे आहे, हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे.

मागच्या महिन्यात अक्षय कुमारने नाशिक पोलिसांना ‘फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाईस’ दिले होते. हेच उपकरण आता अक्षयने मुंबई पोलिसांनाही दिले आहेत. हे उपकरण कोरोना योद्ध्यांची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान आणि हृदयाची गती तपासण्यासाठी याची मदत होणार आहे.

अक्षयच्या मदतीबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी त्याचे आभार मानले आहेत. आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलंय, अक्षयजी हे नेहमीच आपल्या देशाच्या सैनिकांसाठी आणि विविध राज्यातील पोलिसांना मदत करत आले आहेत. तुम्ही कोरोना योद्ध्यांसाठी दिलेल्या या मदतीसाठी मी तुमचे आभार मानतो. यातील काही उपकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेत वापरण्यासंदर्भात आम्ही चर्चा केली आहे.

काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी २५ कोटी रु. प्रधानमंत्री सहायत्ता निधीत मदत दिली आहे. लवकरच ‘सूर्यवंशी, लक्ष्मी बम, बच्चन पांडे आणि पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार प्रेक्षकांना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतसिंग प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

“सेनापती ठाम उभा राहिला मात्र नियतीने त्यांच्या आईची इहलोकीची यात्रा काल संपवली”

3 अनाथ मुलांच्या मदतीला सोनू सूद धावला, घेतली त्यांची सगळी जबाबदारी!

कोरोनाच्या संकटात पुण्यातील गणेशोत्सव मंडळाकडून समाजापुढे नवा आदर्श, घेतला महत्त्वाचा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या