नवी दिल्ली | बाॅलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार नेहमीच चांगल्या कामासाठी चर्चेत असतो. यावेळीही त्याने सामाजिक भान जपत तृतीयपंथीयांसाठी हक्काचं घर बांधण्याकरता सढळ हस्ते 1.5 कोटींची मदत देऊ केली आहे. त्यामुळे त्याच्यातला ‘माणूस’ पुन्हा दिसून आला आहे.
दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांच्या ‘लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ ला अक्षयनं तृतीयपंथीयांसाठी घर बांधण्याकरता मदत केली आहे. राघव लॉरेन्स याने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. त्याने एक फोटो शेअर केला असून यात अक्षय कुमार दिसत आहे.
गेल्या पंधरावर्षांपासून शिक्षण, लहानमुलांसाठी घर, दिव्यांग डान्सरना मदत आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी ‘लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ स्वयंसेवी संस्था काम करते. ही संस्था 15 व्या वर्षांत पाऊल ठेवत आहे. त्यामुळे या वर्षांत तृतीयपंथीयांना मदत करण्यासाठी ही संस्था पुढे आली आहे.
दरम्यान, संस्थेकडून तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर अक्षयने केलेल्या मदतीतून त्यावर घर बांधण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“पंतप्रधान कार्यालयातील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात”
“पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय”
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा अध्यक्ष भडकले, मुख्य सचिवांना दिली ‘ही’ शिक्षा!
“पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय”
“हा डोक्यावर पडलाय काय?, काय बोलतो याचं याला कळेना”
Comments are closed.