मनोरंजन

‘निरमा’च्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात

 मुंबई | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा निरमा पावडरच्या एका जाहिरातीमुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय कुमार निरम्याची जाहिरात पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात वारली पोलीस ठाण्यात अक्षय विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना निरमाच्या जाहिरातीत मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या जाहिरातीमधून अपमान करण्यात येत असून अक्षय कुमारने याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.

‘महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!’ असं म्हणत अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत, असं दृश्य जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा असून या प्रकरणी अक्षय कुमारने माफी मागावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

अक्षयने केलेली निरमा पावडरची जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या-

निर्भयाच्या आरोपींना डेथ वॉरंट; 22 जानेवारीला फाशी

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा

जेएनयू प्रकरण; आईशी घोषसह 19 जणांवर एफआयआर दाखल

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या