मुंबई | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या सोशल मिडीयावरून नुकताच एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये त्याने बॉलिवूडसंदर्भात भाष्य केलंय.
अक्षय म्हणतो, हे संपूर्ण बॉलिवूड तुम्ही लोकांनी प्रेमाने बनवलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर जितकं दुःख तुम्हाला झालं तेवढंच दुःख आम्हाला देखील झालं आहे.
अक्षय पुढे म्हणाला, सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक मुद्दे समोर आलेत. या प्रकारानंतर आम्हालाही आमच्या आत डोकावणं भाग पडलं आहे. शिवाय आमच्या इंडस्ट्रीबद्दलच्या अनेक गोष्टींबद्दल विचार करायला आम्हाला भाग पडलं.
महत्वाच्या बातम्या-
बीडच्या तरुणाची सुसाईड नोट खोटी, अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
‘महाराष्ट्रात उद्योगासाठी पुढे या’; शरद पवारांचं अनिवासी भारतीयांना आवाहन
‘हाथरस प्रकरण एक छोटासा मुद्दा’; उत्तर प्रदेशातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
“त्या सर्वांनी तोंड न लपवता महाराष्ट्र पोलिसांची जाहीर माफी मागावी”