मुंबई | बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचं नाव घेतलं जातं. सध्या अक्षय कुमारच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे कारण अक्षयने त्याच्या मानधनात वाढ केलीये.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने 108 कोटी रूपयांवरून 135 कोटी रूपये इतकी मानधनात वाढ केल्याचं म्हटलंय. यापूर्वी अक्षयने 99 कोटींवरून 108 कोटी इतकी वाढ केली होती.
दरम्यान अक्षय कुमार त्याचा चांगला मित्र फिरोज नाडियावाला याला काही प्रमाणात सूटही देत असल्याची चर्चा आहे.
प्रत्येक वर्षी अक्षयचे जवळपास 4-5 सिनेमे प्रदर्शित होतात. अक्षयचे पृथ्वीराज, राम सेतु, मिशन लायन, रक्षाबंधन हे आगामी सिनेमे आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र
ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे
पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!
“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”
कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत