Top News देश मनोरंजन

मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत- अक्षय कुमार

मुंबई | माझ्या मुलांना घराणेशाहीचा फायदा बिलकूल मिळणार नाही. माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत, असं मत अभिनेता अक्षय कुमार याने हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या कुटुंबियांना काम देण्यापासून अडवू शकत नाही. पण माझ्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर माझ्या स्टारडमचा फायदा त्यांना घेऊन देणार नाही, असं अक्षय कुमार म्हणाला आहे.

आई-वडिलांच्या ओळखीवर एखाद्या व्यक्तीला संघर्ष न करता ही काम करण्याची संधी मिळू शकते. पण मेहनत केल्याशिवाय घराणेशाहीचा आधार घेतला तरी इंडस्ट्रीत टाकता येत नाही, असंही त्यानं मुलाखतीत सांगितलंय.

आरव आणि नितारा या माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर बनण्याचा धडे दिले आहेत. त्यांनी स्वतः आॅडिशन द्यावी अन कामे मिळवावीत, असं सांगत अक्षयने इंडस्ट्रीतल्या नेपोटीझमला विरोध दर्शविला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ- आशिष शेलार

घराणेशाहीबाबत सैफ अली खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला….

धक्कादायक! महिनाभरात महाराष्ट्रात वाढले एक लाख कोरोनाबाधित रुग्ण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या