Akshay Kumar | बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) अक्षयला चित्रपट (Movies) करायला जेवढे आवडतात तेवढेच त्याला मालमत्तेची (Property) खरेदी-विक्री (Buying and Selling) करणेही आवडते. त्याची ही आवड फारशी कोणाला माहीत नसेल. योग्य गुंतवणुकीत (Investment) त्याचा हात कोणीच पकडू शकत नाही, हे तर एव्हाना साऱ्या बॉलिवूडकरांनी मान्य केले आहे. अक्षयच्या मुंबईत (Mumbai) अनेक मालमत्ता आहेत. यापैकी एक अपार्टमेंट अक्षयने विकल्याचे (Sold) समोर आले आहे. या विक्रीतून त्याने थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 2 कोटी रुपयांची कमाई (Profit) केली आहे.
बोरिवलीतील (Borivali) अपार्टमेंटची विक्री
अक्षयने बोरिवलीतील एक अपार्टमेंट 4.25 कोटी रुपयांना विकले आहे. अक्षय कुमारने विक्री केलेले हे अपार्टमेंट स्काय सिटीमध्ये (Sky City) आहे. स्काय सिटी हे ओबेरॉय रिअॅल्टीने (Oberoi Realty) विकसित केलेले असून ते 25 एकरमध्ये (Acres) पसरलेले आहे. अक्षयने नोव्हेंबर 2017 मध्ये 2.38 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केले होते. अपार्टमेंटची खरेदी करतानाची किंमत आणि विकतानाचा आकडा पाहिला तर अक्षयला मोठा नफा झाल्याचे दिसते. केवळ 7 वर्षांत त्याने तब्बल 2 कोटी रुपये कमावले आहेत.
अपार्टमेंट आणि व्यवहाराचा तपशील
काही मीडिया रिपोर्टनुसार, या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ (Area) हे 1,073 चौरस फूट (Square Feet) आहे. त्यात दोन कारसाठी पार्किंगची (Car Parking) देखील सुविधा आहे. विक्रीदरम्यान या व्यवहारात 25.5 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) आणि 30,000 रुपयांची नोंदणी फी (Registration Fee) देखील भरण्यात आली. आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन रेकॉर्डनुसार (IGR Property Registration Record), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांच्या (Bollywood Actors) ओबेरॉय स्काय सिटीमध्ये मालमत्ता आहेत.
अक्षय कुमारची इतर मालमत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारचा खार पश्चिमेतील (Khar West) जॉय लेजेंडमध्ये (Joy Legend) एक आलिशान फ्लॅट (Luxurious Flat) देखील आहे. 2022 मध्ये खार पश्चिमेतील या फ्लॅटसाठी अभिनेत्याने 7.8 कोटी रुपये मोजले होते. अक्षय कुमारचा हा फ्लॅट निवासी संकुलाच्या (Residential Complex) 19 व्या मजल्यावर (19th Floor) आहे आणि 1878 चौरस फूट जागेत पसरलेला आहे.
जुहूमध्ये (Juhu) राहतो अक्षय कुमार
अक्षय (Akshay Kumar) हा सध्या त्याची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि दोन मुलांसोबत मुंबईतील जुहू येथे एका आलिशान समुद्रकिनाऱ्यावरील (Sea-facing) डुप्लेक्समध्ये (Duplex) राहतो. या आलिशान घराची किंमत 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे या घरातून अरबी समुद्राचा (Arabian Sea) सुंदर नजारा पाहायला मिळतो. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा ‘स्काय फोर्स’ (Sky Force) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा (Audience) उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Title : Akshay Kumar Sells Borivali Apartment Earns a Profit of 2 Crores