बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार चाहत्यांच्या भेटीला

मुंबई |  मागील वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू आता कोरोनाची परिस्थिती हळू-हळू सुधारत आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा गोष्टी पुर्ववत सुरू करायचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चित्रपटगृहही खुली होणार आहेत.

अशातच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा एक नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘बेल बॉटम’ असून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची कोणालाच माहिती नव्हती. परंतू आज अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या संबंधी सगळी माहिती दिली आहे.

‘बेल बॉटम’ हा चित्रपट येत्या 27 जुलै रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. अक्षयने एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ब्लू कलरचा सुट घातलेला आहे आणि त्याच्या हातात एक काळ्या रंगाची बॅग आहे. ती घेऊन तो चालत आहे. हे सगळ सुरू असताना त्याच्या बॅकराऊंडला तारखा बदलत आहेत आणि शेवटी 27 जुलै या तारखेवर रेड मार्क येऊन व्हिडीओ संपतो.

दरम्यान, अक्षयने दिलेल्या या माहितीमुळे त्याचा चाहता वर्ग खूप खुश झाला आहे. तसेच त्याच्या हा व्हिडीओ आतापर्यंत 66 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट करत त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘तू तर अंतर्वस्त्र घालायची विसरली’, बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री होतेय ट्रोल

शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाल्या…

काय सांगता ! WTC फायनलच्या विजेत्या संघाला मिळणार, विराटच्या IPL मानधनापेक्षाही कमी पैसे

“चंद्रकांंत पाटलांची अवस्था ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी झालीय”

सनी लिओनचा ‘हा’ न्यूड फोटो सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More