बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अक्षय कुमारच्या घरातील ‘या’ व्यक्तिची प्रकृती खालावली; ICUमध्ये दाखल!

मुंबई |  बाॅलिवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमार सध्या लंडनमध्ये चित्रपटाचं शुटींगमध्ये व्यस्त होता. त्यातच आता अक्षय कुमारची आई अरूणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. अरूणा भाटिया यांना मुंबईच्या हिरानंदानी रूग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

अरूणा भाटिया यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना हिरानंदानी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यानंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाटिया कुटुंबियांनी विनंती केल्यानं रूग्णालयाने यावर कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

आईच्या प्रकृतीची माहिती मिळताच अक्षय कुमार इंग्लंडवरून भारतात परतला आहे. आज सकाळी तो भारतात आल्याची माहिती मिळाली आहे. भारतात आल्यानंतर त्यांने रूग्णालय गाठलं आणि आईची भेट घेतली. अक्षय कुमारच्या आगामी सिंड्रेला या चित्रपटाचं सध्या इंग्लंडमध्ये शुटिंग चालू आहे.

दरम्यान, अक्षय गैरहजेरीत चित्रपटाचं शुटींग सुरू राहणार आहे. नुकताच अक्षयचा बेल बाॅटम हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांनी देखील त्यांच्या या चित्रपटाला पसंती दिल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले जाणार आहेत का?”

अक्षय बोराडे पुन्हा अडचणीत, पत्नीनंतर तरूणीने केला मोठा गुन्हा दाखल

शेअर मार्केटमधील सर्वात मोठी घडामोड, देशातील ‘या’ सर्वात जुन्या बॅंकेचा येतोय आयपीओ!

सत्ता स्थापनेच्या कार्यक्रमात तालिबाननं दिलं ‘या’ सहा देशांना निमंत्रण, भारताच्या कट्टर शत्रूराष्ट्रांचा समावेश!

“मुंडेने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी नियती त्याला सोडणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More