कुणाला विचारून झाडं तोडली?, रामदेव बाबांना हायकोर्टाचा सवाल

अलाहाबाद | हायकोर्टाने योगगुरू रामदेव बाबांना शेकडो झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नोटीस पाठवलीय. रामदेव बाबांनी नोएडातील फूड अॅण्ड हर्बल पार्कसाठी परवानगीविना शेकडो झाडांची कत्तल केलीय.

शेकडो झाडं कुणाच्या परवानगीनं तोडलीत?, झाडं तोडताना सरकारी अधिकारी आणि पोलिस कसे उपस्थित होते?, असे प्रश्न रामदेवबाबांना हायकोर्टानं विचारलेत. त्यावर रामदेवबाबांना 10 दिवसांत उत्तर द्यावं लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश सरकारनं रामदेवबाबांना पतंजली कंपनीच्या फूड अॅण्ड हर्बल पार्कसाठी जमीन दिली होती. नोएडाच्या कादलपूर आणि शिलका गावाजवळ ही जमीन आहे.