Top News आरोग्य कोरोना

कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान करता येणार नाही; नियमावली जाहीर

रशिया | कोरोनाने सर्व जगभरात धुमाकूळ घातलाय. सध्या कोरोनावर लस शोधण्यासंदर्भात जगभरातील १०० हून अधिक प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. दरम्यान लवकरच रशियाची स्पुटनिक व्ही लस येणार आहे.

मात्र कोविड-19 प्रतिबंधित रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्यापूर्वीच रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीसंदर्भात नागरिकांना इशारा दिलाय. स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर नागरिकांना मद्यपान करता येणार नाहीये.

रशियाच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन आरोग्य अधिकाऱ्यांकडून स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर नागरिकांना जवळपास 2 महिने मद्यपान करता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे.

रशियाच्या उप-पंतप्रधान टाटियाना गोलिकोवा यांनी कोरोनाच्या या लसीसंदर्भातील सूचना तसंच नियमांची घोषणा देखील केलीये. “मास्क- सॅनिटायझर वापरणं, किमान लोकांना भेटणं तसंच मद्य सेवन टाळणं या गोष्टी लस घेतल्यानंतर पाळाव्या लागणार असल्याचं,” त्या म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवरच्या खटल्याला कोर्टाकडून ‘तारीख पे तारीख’; या तारखेला होणार सुनावणी

‘बायकोने बजावलंय मेव्हणाच्या लग्नाला आला नाहीत तर…’; सुट्टीसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज

‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान

…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या