बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दारु पिल्याने कोरोनाचा धोका वाढतो का?, वाचा काय आहे सत्य

नवी दिल्ली | कोरोनावर निश्चित औषध अद्याप सापडलेलं नाही. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी अनेक अशास्त्रीय उपाययोजनांची चर्चा, प्रसार सुरू आहे. त्यातच अल्कोहोलच्या सेवनामुळे कोरोना होत नाही, अशा आशयाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

प्रत्यक्षात मात्र अल्कोहोलच्या सेवनामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. सातत्याने किंवा अधिक प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यास कोरोनासह इतर आजारांचाही धोका वाढतो, असं स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं आहे.

‘डब्ल्यूएचओ’ने सोमवारी कोरोनाला प्रतिबंध करण्यासंबंधीच्या उपायांबाबत ट्विटरद्वारे सूचना जारी केल्या. त्यात अल्कोहोलच्या सेवनामुळे कोरोनाचा धोका वाढतो, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नकली अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे इराणमध्ये सुमारे तीनशे नागरिकांचे बळी गेले होते. तर, लॉकडाउनमुळे बंद असलेली दारूची दुकाने सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारतातील मद्यपींकडून होत आहे.

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

ट्रेंडिंग बातम्या-

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर आता ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ही प्रेक्षकांच्या भेटीला

माझ्या घराचं रुग्णालयात रुपांतर करा; बॉलिवुडच्या या दिग्गज अभिनेत्याकडून मदतीचा हात

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मानले महाराष्ट्राचे आभार!

अवधूत वाघांवर बहुतेक कोरोनाच्या धास्तीने परिणाम झालायं- अमोल मिटकरी

हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More