बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तळीरामांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | तळीरामांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने दारूवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता मद्यप्रेमींना दारू स्वस्तात उपलब्ध होणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी दारूवरील उत्पादन शुल्कात 10 टक्के कपात केली आहे. या निर्णयामुळे विदेशी मद्याचे दर 50 रूपये ते 500 रूपयांनी स्वस्त होणार आहेत.

सरकारने दारूवरील मार्जिन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने आता मध्य प्रदेशात विस्की, वाईन, बिअर या सर्वांचे दर कमी होणार आहेत. शिवाय देशी दारू देखील आणखी स्वस्त होणार आहे. देशी दारूचा 110 रूपयांना मिळणारा पाव आता 85 रूपयांना मिळणार आहे.

दरम्यान, शिवराज मंत्रीमंडळाने हेरीटेज दारू बनवायला देखील मान्यता दिली आहे. या निर्णयाने आदिवासींची आर्थिक स्थिती मजबूत होईल, असं मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं आहे. तर मध्य प्रदेश सरकार त्याचं नवं धोरण 1 एप्रिलपासून लागू करणार आहे.

थोडक्यात बातम्या-

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नाटोने दिलेल्या गंभीर इशाऱ्याने जगाचं टेन्शन वाढलं

“माझ्यासारख्या कलाकारांना…”, अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सांगितले मराठी इंडस्ट्रीतले धक्कादायक अनुभव

“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए”

‘कच्चा बादाम’ गाण्यावर चिमुकलीचा क्यूट डान्स व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

काँग्रेसमध्ये दुफळी! कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More