बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यासाठी पुढचे 8 दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या मृत्यृचा आकडा दोनशेच्या पार गेला आहे. तसेच अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे. पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातच आता राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update) इशारा  हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात सर्वच भागात पुढील आठ दिवस पाऊस चांगला जोर धरणार आहे. रायगड, रत्नागिरी,कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र ,विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, नगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणी पुढील पाच दिवस यलो अलर्ट(Yellow Alert) दिला आहे. तसेच  सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात  हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट(Orange Alet) देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.

दरम्यान, गेल्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बुधवारपासून  राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरातून ते आंध्र प्रदेशापर्यंत चक्रिय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पाऊस वाढण्याची शक्यता  आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनीच काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे.

थोडक्यात बातम्या-

आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का

उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका

‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More